अकोट(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील अकोला शहर वगळता अकोट शहरासह इतर सर्व तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण नसल्यामुळे सर्व तालुक्यातील प्रशासनाने आपल्या मर्यादित क्षेत्रातील सिमांची काळजी घेणे गरजेचे आहे.
त्याचाच एक भाग म्हणून सर्व तालुक्यामध्ये बाहेर राज्य व बाहेर जिल्ह्यातून शासकीय गोदामात धान्य येत आहे. ते धान्य कोणत्याही तपासणी शिवाय येत आहे. त्यामुळे सुद्धा तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांनी व्यक्त केली.
शासकीय गोदामात येणाऱ्या त्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक चे निर्जंतुक करून त्या ट्रक चालक व वाहकांची कोरोना तपासणी करणे आता गरजेचे असल्याची विनंती जिल्हा प्रशासन व तालुका दंडाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केली आहे.त्यावर प्रशासनाने त्यांची विनंती मान्य केली असून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.