अकोला,दि.८ – जिल्ह्याकरिता माहे जुन २०२० करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.
ते याप्रमाणे-
अ.क्र. | धान्याचा प्रकार | वाटप परिमाण | धान्य वाटपाचे किरकोळ दर |
---|---|---|---|
१ | प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु | तीन किलो प्रति व्यक्ती | दोन रुपये प्रति किलो |
२ | प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ | दोन किलो प्रति व्यक्ती | दर तीन रुपये प्रति किलो |
३ | अंत्योदय अन्न योजना गहु | १५ किलो प्रति कार्ड | दर दोन रुपये प्रति किलो |
४ | अंत्योदय अन्न योजना तांदुळ | २० किलो प्रति कार्ड | दर तीन रुपये प्रति किलो |
५ | एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु | चार किलो प्रति व्यक्ती | दर दोन रुपये प्रति किलो |
६ | एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ | एक किलो प्रति व्यक्ती | दर तीन रुपये प्रति किलो |
७ | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ | प्रतिसदस्य प्रतिमाह पाच किलो तांदुळ | मोफत |
९ | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना तांदुळ | शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य पाच किलो ( उदा. अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेतील एक सदस्य असल्यास पाच किलो दोन सदस्य असल्यास १० किलो याप्रमाणे) | मोफत |
१० | शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अननधान्याचे लाभ मिळत नाहीत अशा एपिएल केशरी मधील लाभार्थ्याकरिता गहु माहे जुन २०२० | तीन किलो प्रति व्यक्ती | दर आठ रुपये प्रति किलो |
११ | शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अननधान्याचे लाभ मिळत नाहीत अशा एपिएल केशरी मधील लाभार्थ्याकरिता तांदुळ माहे जुन २०२० | दोन किलो प्रति व्यक्ती | दर १२ रुपये प्रति किलो |
१३ | अन्नपुर्णा योजना | पाच किलो गहु व पाच किलो तांदुळ प्रति व्यक्ती | मोफत |
१४ | नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता | एक किलो प्रति शिधापत्रिका लहान मोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धतेनुसार | दर २० रुपये प्रति किलो |
१५ | तुरदाळ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी | प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ या परिमाणात ( तुरदाळ व चणादाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत ) | मोफत |
१६ | चणादाळ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी | ||
जिल्ह्यातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर विशिष्ट आपद्कालीन परिस्थितील केन्द्र शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत विहीत अन्नधान्य जुन महिन्याच्या नियमित नियतनासह वितरीत करण्याच्या सुचना यापुर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच राज्य शासनाने नुकताच राज्यातील एपिएल शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माहे एप्रिल ते जुन या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ या परिमाणात (तुरदाळ व चणादाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) मोफत वितरीत करण्याकरिता नियतन प्राप्त झाले आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्याना वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.