अकोला- कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्या पासून लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडलेले आहेत, सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असल्याने अकोला शहरातील ऑटो चालकांना त्यांचे ऑटो बंद अवस्थेत घरी ठेवून पोट भरण्यासाठी इतर काही कामधंदा शोधणे भाग पडले.
काही ऑटो चालकांनी भाजीपाला विक्री व फळ विक्री करण्याचा प्रयत्न केला काही ऑटो चालकांना उपजीविके पुरते पैसे मिळाले तर काहींना ते पण शक्य झाले नाही, त्या मुळे त्यांना कुटुंबाला दोन वेळेचे जेवन सुद्धा मिळणे कठीण झाले ह्याची माहिती ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शर्मा ह्यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना दिली. त्यांनी अत्यंत गरजू कोण आहेत त्यांची माहिती काढण्यास सांगितली, त्यांनी माहिती फोन नंबर सह दिल्यावर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सदर माहितीची खातरजमा करून अत्यंत गरजू 10 ऑटो रिक्षा चालकांना एक महिना पुरेल असा किराणा भरून देण्याचे ठरविले.
शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेयून स्वेच्छेने वर्गणी गोळा करून काही रक्कम गोळा केली काही रक्कम सामाजिक कार्यकर्ते महेश बजाज ह्यांनी टाकून 10 गरजू ऑटो रिक्षा चालकांना मदत केली. शासन आपल्या परीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु महामारीच्या ह्या काळात प्रत्येकाने सामाजिक दायित्व स्वीकारून पुढे येऊन जशी जमेल तशी मदत करणे आवश्यक आहे; ह्या जाणिवेतून शहर वाहतूक शाखेने केलेल्या माहितीचे ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
अधिक वाचा: बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!