बुलडाणा : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत २४ रूग्ण बाधीत केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण कोरोना निवळण्यासाठी तयार झाले आहे. आतापर्यत २० रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन, सिंदखेडराजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील दोन, मलकापूर येथील चार, दे.राजा येथील दोन आणि सिंदखेड राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
त्यामध्ये आज एका रूग्णाची भर पडली आहे. आज चिखली येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण २०६ रूग्ण बरे झाले. बुलडाणा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे बुलढाणा जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या २० झाली आहे. जिल्ह्यात कोविड -१९ आजाराने २४ रूग्ण बाधित होते. बुलढाणा येथे आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या २० रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता ३ रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार