तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोल्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असून कोरोनाने आपली वाट आता गावाकडे वळवली असून पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत अशातच तेल्हारा शहरातील तीन व एका गावातील दोन संशयित रुग्णांना अकोला येथे पाठवण्यात आले आहे.
अकोल्यात एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेला रुग्ण हा पॉझिटिव्ह आल्याने तेल्हारा शहरातील एक जण त्याच दवाखान्यात उपचार घेऊन शहरात त्याच्या दोन नातेवाईकांसोबत परत आला होता. सदर अकोल्यातील दवाखान्यात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून शहरातील संशयित तीन जणांना अकोला पाठवण्यात आले तर तालुक्यातील एका गावातील संशयित दोन जणांना सुद्धा अकोला पाठवण्यात आले आहे. शहरातील तसेच एका गावातील संशयित रुग्णांना अकोला पाठवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात अफवा पसरवल्या जात आहेत. कोरोनाची धास्ती तालुक्यातील जनतेने घेतली आहे मात्र “हम नहीं सुधरेंगे घर के बाहर निकलेंगे “अशी परिस्थिती सद्या तालुक्यात आहे.









