अकोला – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भात आपली जीवाची पर्वा न करता दैनंदिन स्वच्छतेचे काम करणारे अकोला महानगरपालिका येथील सफाई कर्मचा-यांकरिता दि. 4 मे रोजी कच्ची मेमन समाजाच्या वतीने हॅण्ड सेनीटायझरच्या 750 बॉटल मनपा उपायुक्त वैभव आवारे यांना देण्यात आल्या.
यावेळी कच्ची मेमन समाजाचे अध्यक्ष श्री जावेद जकेरिया, बिलाल ठेकीया, शफी सुर्या, अनीस हालारी, मुश्ताख रस्सीवाला, फिरोज दर्या, संजरी पेन्ट्स यांची उपस्थिती होती.