अकोला,दि.४- जिल्ह्यात महानगरपालिका हद्दीत कोवीड बाधितांची वाढती संख्या पाहता निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना, अलगीकरण कक्ष व विलगीकरण सुविधांची उपलब्धता, तसेच बाहेर गावी जाऊ इच्छिणाऱ्या व बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणी सुविधा आदींबाबत चर्चा करुन आढावा घेण्यात आला.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार