अकोला,दि.४- खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे, ख्ते, किटकनाशकांची खरेदी केली जाते. ही खरेदी करतांना शेतकऱ्यांनी दक्ष राहून व प्रमाणित मान्यताप्राप्त कंपन्यांकडूनच खरेदी करावी व त्यासाठि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करतांना घ्यावयाची काळजी-
१. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्या.
२. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा.
३. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन/ पिशवी, टॅग,खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
४. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करा.
५. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहुन घ्या.
६. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.
७. किटकनाशके अंतिम मुदतीच्या ( Expiary date)आतील असल्याची खात्री करा.
८. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष/ दुरध्वनी/ इ-मेल/ एस.एम.एस./ इत्यादीव्दारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा.
९. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी / तक्रारी सोडविण्यासाठी / मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३ ४००० वर संपर्क साधावा.
असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार