अकोला (दीपक गवई)- अकोला जिल्ह्यातील अंत्री मलकापूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने तातळीने दखल घेत गाव गाठून घरोघरी जाऊन ३०५ घरांमधील १५२६ जणांचे सर्वेक्षण केले. यावेळी बाहेर राज्यातून गावावरून आलेल्यांची तपासणी करावी. आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अंत्री मलकापूर वासीयांना केले. यावेळी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भावना हाडोळे, साथ रोग अधिकारी डॉ मानकर, डॉ संजय शर्मा, डॉ ताडे आदी उपस्थित होते.