अकोला (प्रतिनिधी)- मे महिन्याचे कडक ऊन तापायला लागले आणि जनावरांचे पाण्याविण्या हाल होऊ लागले हे लक्षात घेता कुणाल शिंदे मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण प्रभाग क्र.20 मध्ये जिथे जिथे गुरे ढोरे सावलीचा आधार घेऊन बसतात अश्या सर्व ठिकाणी पाण्याची सोय व्हावी म्हणून सिमेंट चे पाण्याचे टाके बसविण्यात आले. आनंदाची गोष्ट ही की आजूबाजूच्या नागरिकांनी पाठीवरती थाप देऊन शाबासकी देत त्या टाक्यांमध्ये पाण्याची सोय करण्याचे ठोस आश्वासन देत सामाजिक जोपासने चे दर्शन दिले. शिवसेना शहर प्रमुख मा. अतुल पवनिकर आणि अंकुश ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्दा सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरवून भूतदयेचा हा उपक्रमराबविण्यात आला…
या उपक्रमात कुणाल शिंदे, नमन आंबेकर, भूषण शिंदे, रोशन म्हैसने, भागवत, देशमुख, समीर बोरोकार, सौरभ सैत्वाल, प्रणव बोबडे, तुषार फुकट इत्यादीनी परिश्रम घेतले