अकोला,दि.३ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ६३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४८ अहवाल निगेटीव्ह तर १५ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान दोघा महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या सात झाली आहे.आज दुपारनंतर दोघांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या १३ झाली आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ५५ झाली असून प्रत्यक्षात ३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ८८५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७९२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ७३७ अहवाल निगेटीव्ह तर ५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ९३ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ८८५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७१४, फेरतपासणीचे ९४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६२१ तर फेरतपासणीचे ९४ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७७ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५५ आहेत. तर आज अखेर ९३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज प्राप्त झालेल्या ६३ अहवालात ४८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १५ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत ५५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि आज (रविवार दि.३ मे) दोघांना असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या दोघा महिलांचे निधन दि.१ व दि. २ रोजी झाले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले, त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.
एकाच दिवशी १५पॉझिटीव्ह
आज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा १२ जण तर सायंकाळी सहा वाजता प्राप्त अहवालात तिघे जण, असे दिवसभरात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या १२ रुग्णांपैकी दोन महिला या दि.१ व दि.२ रोजी मयत झाल्या. तर उर्वरीत दहा जणांपैकी तिघे मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात तिघे पॉझिटीव्ह रुग्ण असून त्या तिनही महिला आहेत. त्यात एक महिला ही न्यू भिमनगर येथील तर अन्य दोन्ही महिला या बैदपूरा येथील रहिवासी आहेत.
दोघांना डिस्चार्ज
दरम्यान,आज बैदपुरा येथील दोघांना पुर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ही दोघे भावंडे असून या आधीच्या एका मयत रुग्णाची अपत्ये आहेत. त्यांना आज रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सने टाळ्या वाजवून निरोप दिला.
दरम्यान आजअखेर ८५६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृहअलगीकरणात व १६६ संस्थागत अलगीकरणात असे ४९० जण अलगीकरणात आहेत. तर २४६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १२० रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.