कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी देशात उद्या, ४ मे पासून लॉकडाऊन ३ लागू करण्यात येणार आहे. दोन आठवड्यांच्या या लॉकडाउनदरम्यान रेड झोनमध्येही विविध सवलती देण्यात आल्या आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून एकही संसर्गग्रस्त आढळला नाही, अशा जिल्ह्यांना आरोग्य मंत्रालयाकडून ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. पूर्वी ही अट २८ दिवसांच्या घरात होती.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून राज्यांचे मुख्य सचिव तसेच आरोग्य सचिव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर देशातील जिल्ह्यांची नवीन वर्गवारी जाहीर करण्यात आली आहे. नव्या वर्गवारीनूसार देशातील १३० जिल्ह्यांना हॉटस्पाट (रेड झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. उर्वरित २८४ जिल्हयांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.
अधिक वाचा : कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणार ‘आरोग्य सेतु’ App
कोरोनाग्रस्तांची संख्या, ही संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी, करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासण्या, यावरून हे झोन तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेड आणि ऑरेंज झोनमध्ये खासकरून योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची स्पष्टोक्ती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, किंवा फार कमी रुग्ण आहेत, अशा विभागात आर्थिक हालचाली सुरू करण्यासाठी उद्योगधंदे काही प्रमाणात सुरू करता येतील.
हे झोन जिल्हा, तालुका आणि महानगरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आणि ही संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी यावरून निश्चित करण्यात आले आहेत, जेणेकरून राज्य सरकारला मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांची संख्या आढळून येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विशेष उपाययोजना करता येतील. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार रेड, ऑरेंज तसेच ग्रीन झोनमध्ये पुढील सेवांना सवलत देण्यात आली आहे.
* रेड झोन…
रेड झोनलाच ‘हॉट स्पॉट’ असेही म्हटले जाते. ज्या जिल्हा, तालुका किंवा महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असतील अशांना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्यातील ८० टक्के कोरोनाग्रस्त याच झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यांमध्ये संसर्गग्रस्तांची संख्या ४ दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होते.
* ऑरेंज झोन...
ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून एकही संसर्गग्रस्त आढळला नाही, असे जिल्हे.
* ग्रीन झोन…
गेल्या २१ दिवसांपासून एकही कोरोनाग्रस्त आढळला नाही असे जिल्हे.
ग्रीन झोनच्या निकषात बदल…
गृहमंत्रालयाकडून लॉकडाऊन ३ साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने ग्रीन झोनच्या निकषात बदल केला आहे. पूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांमध्ये कोरोनासंसर्गग्रस्त आढळला नाही त्यांना ग्रीन झोन मानले जात आहे. आत ही अट २८ वरून २१ दिवसांवर आणण्यात आली आहे. याप्रकारे आता देशातील ३१९ जिल्हे ग्रीन झोन मध्ये आले आहेत. तर केवळ १३० जिल्हेच रेड झोनमध्ये आहेत. उर्वरित २८४ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत.
अधिक वाचा : बिग ब्रेकिंग- अकोल्याने गाठली हाफ सेंच्युरी,आज पुन्हा १२ रुग्ण पॉझिटीव्ह
१७ मे पर्यंत सर्वच झोनमध्ये लागू राहतील या अटी…
* लॉकडाऊन ३ दरम्यान संपूर्ण देशात संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजतापर्यंत जीवनाश्यक वस्तूंसाठी वगळता इतर कामांसाठी बाहेर पडता येणार नाही. नागरिकांच्या अनावश्यक वर्दळीवर आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून जमावबंदी (कलम १४४) लागू केले जाईल.
* रेल्वे, विमानवाहतूक, मेट्रो तसेच आंतरराज्यीय बस सेवा सुरू राहणार नाही.
* धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक तसेच क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रमांवर पूर्वीप्रमाणेच बंदी राहील.
* देशभरात ६५ वर्षाहून अधिक वय असलेले वृद्ध, १० वर्षांखालील बालके, गरोदर महिला तसेच गंभीर आजारी रूग्णांना घराबाहेर पडण्यास बंदी. केवळ आवश्यक कामासाठी अथवा उपचारासाठी त्यांना बाहेर पडता येईल.
* रेड झोन मध्ये मर्यादीत सेवा सुरू केल्या जातील. पंरतु, रेड तसेच ऑरेंज झोनमध्ये नियंत्रण क्षेत्र तसेच त्याच्या चारही दिशेला असलेल्या बफर झोनला सोडून उर्वरित परिसरात सलून, मद्य, सिगारेट, पान, गुटखा तसेच तंबाकू ची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये मॉलही सुरु करण्याची परवानगी.
अधिक वाचा : सृष्टी वरील संकटा वर मात करत असताना, तरुणांनी दिली तरुणाला दृष्टी
‘रेड झोन’मधील बंदी
* बस, रिक्षा, ऑटो, टॅक्सी तसेच खासगी कॅब कंपनी सेवा बंद राहणार. शिवाय सलून, स्पा, ब्यूटी पार्लर ही सुरू करण्याची परवानगी नाही.
रेड झोनमध्ये दिलासा….
* रेड झोन मधील नागरिकांना काही सेवांसाठी खासगी वाहनांने येजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंरतु, कारमध्ये चालकासह केवळ दोघांनाच बसता येईल. दुचाकी वाहनचालकालाच येजा करण्याची परवानगी राहील.
* विशेष आर्थिक क्षेत्रातील (एसईझेड) तसेच निर्यात आधारित यूनिट (ईओयू) सह औद्योगिक वसाहती तसेच क्षेत्रांमध्ये कामकाज सुरू करण्याची पूर्णत: सवलत राहील.
* जीवनावश्यक वस्तू जसे औषधी, वैद्यकीय उपकरणे तसेच त्यांच्यासाठी इतर साहित्य बनवणा-यांची पूरवठा साखळी, आयटी हार्डवेअर कामांनाही सवलत.
* वृत्तपत्र, इलेक्ट्रानिक मीडिया, आयटी सेवा, कॉल सेंटर, शीतगृहे, वेयरहाऊसिंग सेवा तसेच खासगी सुरक्षा रक्षकांना कामाची सवलत राहील.
शहरी भागातील रेड झोनमधील विशेष सवलती
* मजूरांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी बांधकामाला परवानगी. पंरतु, बाहेरून मजूरांना आणता येणार नाही.
* मॉल तसेच बाजार बंद राहतील. पंरतु, कॉलनी, रहिवासी भाग तसेच विभक्त असलेली सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकानांचे जीवनावश्यक तसेच इतर वस्तूंचे दुकाने असा फरक करण्यात आलेला नाही.
* ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा करण्याची परवानगी. अनावश्यक साहित्य विक्रीवर तूर्त बंदी.
*सर्व खासजी कार्यालये ३३ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी. उर्वरित कर्मचा-यांसाठी ‘वर्क फॉर्म होम’.
* ३३ टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत सर्व सरकारी कार्यालये सुरू राहतील. उप सचिव तसेच वरिष्ठ स्तरीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील.
* संरक्षण, आरोग्य, पोलीस, कारागृह, होमगार्ड, नागरिक सुरक्षा, अग्निशमन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, एनआयसी, कस्टम, एफसीआय, एनसीसी, नेहरू युवा केंद्र तसेच नगर पालिकांना सवलत देण्यात आली आहे.
अधिक वाचा : रासायनिक खतांची विक्रेत्याने पॉस मशीनऐवजी आॅफलाइन विक्री केल्यास परवाना रद्द!
ग्रामीण भागातील रेड झोनमधील विशेष सवलती…
* ग्रामीण भागात असलेल्या रेड झोन जिल्ह्यातील सर्व नियंत्रण क्षेत्र तसेच बफर झोन वगळता जिल्ह्यात सर्वप्रकारची आर्थिक तसेच बांधकाम कामांना सवलत देण्यात आली आहे. मनरेगा, अन्न प्रक्रिया तसेच वीट भट्टयांचा त्यात समावेश आहे.
* सर्व दुकाने तसेच मॉल सुरु राहतील. कृषी संबंधीत कुठल्याही कार्यावर बंदी राहणार नाही.
* बॅक, वीमा सह सर्व प्रकारच्या आर्थिक कारभार सरु राहतील.
* अंगणवाडी सह महिला, विधवा, वृद्ध तसेच मुलांची देखभाल करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आश्रमांना काम करण्याची सवलत देण्यात आली आहे.
* कुरियर तसेच टपाल सेवांनाही परवानगी देण्यात आली आहे.
ऑरेंज झोन मधील सवलती…
* रेड झोन मध्ये बंद असलेल्या ओला, उबर सारख्या टॅक्सी सेवांना ऑरेंज झोनमध्ये चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंरतु, केवळ एकाच प्रवाशाला कॅब चालकाला बसवात येईल.
* दुचाकीचालकांना डब्बल सीट बसवण्याची परवानगी. रेड झोनमध्ये ही परवानगी नाही.
* काही सेवांसाठी लोकांना एका जिल्ह्यातून दुस-रा जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
* बस सेवा सुरु करण्याची परवानगी नाही.
ग्रीन झोन मधील सवलती…
* ग्रीन झोन परिसरात राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आलेल्या बंदी व्यतिरिक्त कुठलीही बंदी राहणार नाही. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार सुरु राहतील.
* ५० टक्के प्रवाशांसह परिवहन सेवेतील बसेसेच सुरु करण्याची परवानगी. ग्रीन झोन मधील जिल्ह्यातून दुस-या ग्रीन झोन जिल्ह्यात जाता येईल.
* मॉल सह सर्व दुकाने सुरु करण्याची परवानगी.
* ई-कॉमर्सवरून सर्व साहित्याची डिलेव्हरी केली जाईल.