अकोला,दि.२ – सध्या कोरोना बाधितांची संख्या अकोला शहर व परिसरात वाढत आहे. ते पाहता हा संसर्ग जिल्ह्यातील अन्य तालुक्यात वा शहराशी संलग्न भागात पोहोचू नये यासाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
त्यानुसार अकोला शहर वा तालुका हद्दीतून कोणिही व्यक्ती विनापरवानगी शेजारच्या तालुक्यात जाणार नाही याची खबरदारी तालुका प्रशासन तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.
अधिक वाचा: CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांची सामाजिक बांधीलकी….