अकोला,दि.२- प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जुन २०२०) प्रति महिना पाचशे रुपये इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जमा करण्यात येत आहे. त्यानुसार मे महिन्याची रक्कम शनिवार दि.२ पासुन सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे. या वेळापत्रकानुसार खातेदारांनी आपल्या खात्यातील रकमा काढण्यासाठी बॅंकेत यावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक आलोक तराणिया यांनी केले आहे.
वेळापत्रक याप्रमाणे-
दिवस पहिला: सोमवार दि. ४- ज्या खाते क्रमांकांचा शेवट ० किंवा १ ने होतो त्या खातेदारांनी यावे.
दिवस दुसरा: मंगळवार दि.५- ज्याखाते क्रमांकांचा शेवट २ किंवा ३ ने होतो त्या खातेदारांनी यावे.
दिवस तिसरा: बुधवार दि.६- ज्या खाते क्रमांकांचा शेवट ४ किंवा ५ ने होतो त्या खातेदारांनी यावे.
दिवस चौथा : शुक्रवार दि. ८- ज्या खाते क्रमांकांचा शेवट ६ किंवा ७ ने होतो त्या खातेदारांनी यावे.
दिवस पाचवा : सोमवार दि.११- ज्या खाते क्रमांकांचा शेवट ८ किंवा ९ ने होतो त्या खातेदारांनी यावे.
असे वेळापत्रक कळविण्यात आले आहे. तरी खातेदार महिलांनी एकाच दिवशी खात्यातून पैसे काढण्यासाठी गर्दी करु नये. आपल्या खाते क्रमांकानुसार यावे. याशिवाय एटीएम वरुनही पैसे काढता येतात, असेही कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा: CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांची सामाजिक बांधीलकी….