अकोला: अमरावती जालना आणि बुलढाणा येथील 3 युवक हे राजस्थान येथील जयपूर येथे नोकरी निमित्त होते आणि लॉकडाऊन दरम्यान ते मागील 40 दिवसांपासून तेथे अडकून होते आणि महाराष्ट्रात घरी परतण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना परवानगी मिळण्यास अडचण होत होती, 29 तारखेला त्यांनी अकोल्याचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्याशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली असता. आशिष पवित्रकार यांनी तत्परतेने तयारी दाखवली आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील साहेब यांच्या मदतीने जयपूर च्या स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधून सदरील नागरिकांची अडचण सांगू त्यांची मदत करावी आणि प्रवासासाठी परवानगी द्यावी असे सांगितले
सदरील युवकांनी सांगितले की दुपारी 2 वाजता आशिष पवित्रकार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्वतः आमच्याशी संपर्कात राहून संध्याकाळी 6 पर्यंत अवघ्या 4 तासात परवानगी पत्र आणि वाहन दोन्हींची व्यवस्था करून दिली आणि अकरा वाजता त्यांचा प्रवास सुरु झाला. त्या तिन्ही युवकांनी तेथून निघताना आधी महाराष्ट्रात पोहोचल्यावर आशिष पवित्रकार आणि डॉ रणजित पाटील यांचे खूप आभार मानले
तिन्ही युवकांनी व्यवस्थित काळजी घेऊन आणि लॉक डाऊन चे नियम पाळून प्रवास केला तसेच आपल्या मूळगावी पोहोचल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी सुध्दा करून घेतली.
अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला;निवडणूक आयोगाची परवानगी