पातुर (प्रतिनिधी): कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन परिस्थिती आहे. सर्व बार,दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांचे बेहाल झाले आहे.म्हणून हे लोकं गावठी दारू कडे वळल्याचे दिसून येते.त्यावरूनच जास्त गावठी दारू विकणारे वाढलेले आहेत. पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक बीटमध्ये अवैध मोहफुलाची दारू तयार करणं चालू असल्याची माहिती आहे.ही दारू शहरी भागातही पुरवल्या जाते.अकोला शहराचे तळीराम सकाळी 8 ते 12 वाजताच्या वेळेस आडमार्गाने दारूची वाहतूक करत आहेत.या सर्वांना पातुर पोलिसांची मूकसंमती आहे का? असा प्रश्न पडला आहे.शहरी भागात ही मोहफुलाची दारू एक लिटर तीनशे रुपयाला विकली जाते.देशी,विदेशी चे भाव गगनाला भिडल्याने सर्व सामान्य लोकं हे मोहफुलावरच आपली तहान भागवत आहेत.लॉक डाउनच्या काळात देशी,विदेशीवर दारू बंदी विभागाने कार्यवाही केल्या आहेत.पण तरीही पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात मोहफुलाची विषारी दारू काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
चिल्लर विक्री न करता ठोक दारू विकली जाते.पातुर परिसरात अकोल्याच्या तळीरामांची गर्दी वाढत आहे.पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाभुळगाव येथील बीट जमादार यांनी अकोला येथील शुभम रमेश गावंडे रा.पोळा चौक, राहुल सुनील मेसरे रा.बाळापूर नाका या दोघांना अवैध मोहफुलाची दारू वाहतूक करतांना पकडले आहे.त्यांच्या कडून अंदाजे 62 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास बाभुळगाव बिट जमादार जायभाये करत आहेत.