अकोला, दि.२९: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांचे फेसबुक पेजवर या https://www.facebook.com/dioakola/ लिंकवर जाऊन आपण हा संवाद ऐकू व पाहू शकाल, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अधिक वाचा: हिवरखेड परीसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान …