हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड व परीसरात काल दिनांक 28 एप्रिलला अचानक आलेल्या पावसामूळे शेतकर्याचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केळीचे झाडे जमिन दोस्त झाली आहेत. अगोदरच कोरोणाच्या भीतीने व शासनाचे आदेशाने पुर्ण भारतात लाॅक डाऊन असल्याने केळि पिकाचे भाव मागील वर्षी पेक्षा कमी आहे. तसेच ग्राहकांची मागणी कमी प्रमाणात असल्याने व्यापारी सुद्धा कमी दराने खरेदी करतात. माल कापुन ठेवला तर खराब होतो. शेतकरी स्वतः मोठ्या प्रमाणात माल गावच्या बाजार पेठेत विक्री करू शकत नाही. त्या मधे सतत निसर्गाच्या लहरीपनाच्या कृपेने बेमोसम वादळी वार्यासह पाऊस आल्या मूळे येथिल शेतकर्याचे शेतातील केळिचे झाळे ऊन्मडून पडल्यामूळे केळी ऊत्पादक शेतकर्यासहीत इतर बर्याच पिकाचे सुद्धा नूकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने केळी ऊत्पादक व इतर पिकाचे सर्वे करुन नूकसान भरपाई द्यावी अशी मागनी शेतकरी करीत आहेत.