अकोला, दि.२९: आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३० अहवाल प्राप्त झाले. ते ३० अहवाल निगेटीव्ह आले. त्यातील आठ अहवाल हे सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६४९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६१७ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५९५ अहवाल निगेटीव्ह २२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३२ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ६४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२१, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६१७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९१ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५९५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २२ आहेत.
आज प्राप्त झालेल्या ३० अहवालात सर्व ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश आहे. सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील ५४ जणांची तपासणी आज पर्यंत झाली असून त्यातील ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता फक्त चार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.
आजअखेर एकूण प्रलंबित अहवाल संख्या ३२ असून त्यात ३० प्राथमिक तर दोन हे फेरतपासणीचे अहवाल आहेत.
जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या २२ आहे. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आजअखेर १२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आजपर्यंत दाखल प्रवाशी संख्या ६५५ असून २८९ गृह अलगीकरणात तर ८४ हे संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३७३ अलगीकरणात आहेत. आतापर्यंत २४० जणांची गृह अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत संपली आहे. तर विलगीकरणात ४१ रुग्ण दाखल आहेत. आज नव्याने तीन संदिग्ध रुग्ण दाखल झाले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
अधिक वाचा: हिवरखेड परीसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान …