तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन करून घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र काही जुगारी लॉकडाऊन चा फायदा हा जुगाराचा डाव भरवून घेत आहेत. अशाच सहा जुगारीना तेल्हारा पोलिसांनी रंगेहाथ पकडून १ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तालुक्यातील ग्राम डवला(तळेगाव) या ठिकाणी जुगार मोठ्या प्रमाणात खेळल्या जातो अशी गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. तेल्हारा पोलिसांनी लगेच दि २७ एप्रिलच्या रात्री १.३० वाजता डवला हे गाव गाठून सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये आरोपी विक्की मोहन टावरी(२८),रामकृष्ण मुरलीधर मनतकार(३७),सोपान पंजाब अमझरे(२३),श्रीकृष्ण वासुदेव अमझरे(३८),गजानन महादेव अमझरे(३५) सर्व रा डवला, प्रशांत रामराव मुंडाले(२२)रा नखेगाव ता अकोट यांना रंगेहाथ अटक केली. यामध्ये दोन मोटारसायकल चे मालक फरार दाखवण्यात आले. यावेळी दोन मोटारसायकल किंमत ६० हजार ,मोबाईल किंमत २९ हजार,नगद १५ हजार असा ऐकून १ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करून जुगार अक्ट कलम १२ नुसार कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे, पो कॉ गजानन राठोड, राजेश्वर सोनोने, विजय खेकडे, आशिष सिरसाट, करणसिंग ठाकूर यांनी केली.