अकोला(दीपक गवई)- पॉझिटीव्ह आढळलेल्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल ४६ जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात दाखल संदिग्ध रुग्णांची संख्या ६० झाली आहे. तर आज दिवसभरात फ्लू बाह्य रुग्ण विभागात १३१ जणांची तपासणी झाली. या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी, नमुने घेणे आदी कामे आज दिवसभर करण्यात आली, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाली आहे.