खामगाव- एकीकडे सांप्रदायीक वातावरण गढुळ होत असतांना एका हिंदु व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरातील कोणची पुढे येत नसताना एका मुस्लीम व्यक्तीने पुढकार घेतल्याची घटना खामगाव तालुक्यातील रोहना येथे समोर आली आहे. यानिमित्ताने खऱ्या भाईचाऱ्याचे दर्शन घडले. होय हाच आमचा खरा भारत असल्याचे उदाहरच येथे दिसून आले.
खामगाव तालुक्यातील रोहना येथील अंकुश देशमुख वय ३७ हे आजारी असल्याने त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा क्षयरोग रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव हे रुग्णवाहिकेतून त्यांच्या रोहना या गावात आणण्यात आले. विशेष म्हणजे बुलडाणा येथील रुग्ण वाहिका चालकाने सुद्धा माणुसकी दाखवत मोफत सेवा दिली. मात्र रुग्ण वाहिका गावात आली तेव्हा कुणीही मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नव्हते. क्षयरोगाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी अंत्यविधीसाठी नकार दिली. ही माहिती रुग्णवाहिका चालकाने जिल्हाधिकारी यांना दिली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लगेचच तहसीलदारांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली तहसीलदारांनी ग्रामसेवकाला लक्ष देण्यास सांगितले तोपर्यंत तब्बल चार तास त्या मृत व्यक्तीजवळ फक्त त्याची पत्नी व दोन मुली होत्या. परंतु आपल्यातील माणुसकी जीवंत असल्याचे दाखवून देत शेजारीच राहणाऱ्या मो. कमरुद्दीन यांनी अंकुश देशमुख यांचे शव रुग्णवाहिकेतून बाहेर सुध्दा काढले व त्यांच्यावर अत्यंसंस्कार सुध्दा केले. या सर्व परिस्थिती त्यांनी कुठेच भांडवल केले नाही किंवा गाजावाजा देखील केला नाही. ऐकीकडे सामाजिक वातावरण गढुळ होत असतांना मात्र तालुक्यातील रोहणा येथे माणुसकीचे आणि भाईचारा जिवंत असल्याचे दर्शन घडले आहे.
अधिक वाचा: पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.