अकोट(शिवा मगर): कोरोना संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अकोट शहरातील हिवरखेड रोडवरील ड्रीमलैंड वाईन बार रेस्टॉरंट फोडून यामधुन महागडी दारुसह इलेक्ट्रॉनिक्स साहीत्या असा एकुण एक लाख १८ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २१ एप्रिल मगंळवारी रोजी उघडकीस आली होती.
याप्रकरणी नंदकिशोर जांभुळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४६१,३८० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात होता यावरून अकोट शहर पोलीसानी बारकाईने तपास करीत मोठ्या शिताफीने अकोट शहरातील काही अट्टल गुन्हेगाराना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता शहरातील ड्रीमलैंड वाईन बार रेस्टॉरंट फोडल्याची कबुली दिली याप्रकरणी अकोट शहर पोलीसांनी.
१) अजय नागोराव वैद्य
२)गोवर्धन गणेश हरमकार
३) दिनेश ईश्वरसिंग ठाकुर
४)गणेश तुळशीराम काळमेघ
५)तिलक कैन्हयालाल अहीर
सर्व राहणार अकोट यांना ताब्यात घेवुन यांच्याकडुन विविध कंपनीची विदेशी दारूसह सीसी कॅमेरे,एलईडी टीव्ही, एलसीडी, संगणक संच, सीसीटीव्ही रेकॉर्डर असा एकूण
एकुण मुद्देमाल ४७हजार आठशे ३६रूपायाचा माल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे..
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले याच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.निरीक्षक रजिंतसिह ठाकुर डी बी स्काॅडचे सजंय घायल सुलतान पठाण गोपाल अघडते राकेश राठी विजय सोळंके विठ्ठल चव्हाण यांनी केली.