अकोला ( प्रतिनिधी ): देशभरासह संपुर्ण राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना विषाणुची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासशाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. देशात लॉकडाऊन असल्यापासुन आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशाताई, पत्रकार, नगरपालिका महानगरपालिका कर्मचारी, ग्रामपंचायत स्तरावरचे आरोग्य कर्मचारी सातत्याने आपल्या जिवाची पर्वा न करता देश सेवा करत आहेत. ईमानईतबारे आपले कर्तव्य बजावत आहेत त्यामुळे सरकार ने पोलीस वगळता सर्वाना विमा आरोग्य कवच जाहीर केले आहे. पंरतु २४ तास रस्त्यावर उभे असणारे जनतेला घराच्या बाहेर पडु नका बाहेर कोरोना आहे असे आवाहन करणारे पोलीस मात्र या विम्या पासुन वंचित राहीले आहेत. कायदा सुव्यवस्था राखत असतांना रोजच जनतेचा संपर्क येतो, कोणव्यक्ती कसा आहे याची कुठलेही माहीती नसते. याचे उदाहरण म्हणजे मालेगांव येथे तैनात असलेल्या ६ सिआरपीएफ जवानाना कोरोनाची लागण झाली. तेव्हा पोलीस आपले जिव धोक्यात घालुण आपले कर्त्यव बजावत आहेत त्यामुळे सरकार ने इतराप्रमाणे पोलीसांना सुध्दा १ कोटीचे विमा संरक्षण द्यावे. अशि मागणी ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना दीलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.