तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील ग्राम अकोली रुपराव येथील ११ वर्षीय मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना काल रात्री घडली.
ग्राम अकोली रुपराव येथील इयत्ता ५ व्या वर्गात शिकणाऱ्या अजय लक्ष्मण इंगळे वय(११) हा रात्री टीव्ही बघत असतांना गर्मी होत असल्याने कुलर लावण्यास गेला असता कुलरचे बटन दाबता क्षणी जबर शॉक लागला.यावेळी घरात उपस्थित घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अजय मनमिळाऊ व घरचा लाडका असा होता.मृतक अजय याला एक बहीण असून आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.तेल्हारा पोलिसांनी झिरो मर्ग दाखल करून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.या बाबत पुढील तपास हिवरखेड पोलीस करणार आहेत.
तेल्हारा तालुक्यातील दुसरी घटना
गेल्या आठ दिवसात तेल्हारा तालुक्यात शॉक लागून दोन जणांचा दुर्देवी मृत्यु झाला असून दोन्ही मृतक हे अल्पवयीन होते.नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे व्यवस्थित हाताळून घरातील वायरिंग व्यवस्थित आहे की नाही याची दक्षता घेऊन अशा घटना होण्यापासून वाचायला हवे.घरातील लहान मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी उपकरणांना हात लावू देऊ नये याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.