• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, September 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विशेष लेख- कोरोनाच्या सावटात उन्हाळी हंगाम व पिक नियोजन

Team by Team
May 1, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
rabi-crops
12
SHARES
598
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: सध्या कोरोना संसर्गाचे सावट सगळीकडे आहे. अशा वातावरणात शेतकऱ्याला उन्हाळी हंगामाचे आणि पुढच्या हंगामाचे नियोजन करावयाचे आहे. त्यासाठी विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी संदेश पाठविण्यात आला आहे.

कोरोनापासून बचावासंदर्भात पाळावयाचे नियम व सुचना

हेही वाचा

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

शेतकऱ्यांनी या कोविड- १९ च्या/कोरोनापासून बचाव करण्यासाठी शेतकाम करतांना एकमेकांपासून ६ फूटाचे अंतर ठेवावे. नाका तोंडाला मास्कचा वापर करावा. शेतमाल काढणीचे काम करत असताना चार ते पाच फूटांचा पट्टा वाटून यावा. गर्दी करु नका. वेळोवेळी साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. कुठलाही आजार झाल्यास त्वरीत शासकीय डॉक्टरकडून तपासणी करुन घ्यावी. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

पिक नियोजनासंदर्भात सुचना-

अ) सर्वसाधारण सूचना 

१. रब्बी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचे कोष व
घातक बुरशीचा नायनाट होईल.
२. जमीन सुधारणेची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. शेतीची मशागत उताराला आडवी किंवा शेतात समतल (कंटूर)
रेषेला समांतर करावी. शेताबाहेर पाणी मिश्रीत माती वाहून जाणार नाही याबाबत काळजी घ्यावी.
३. पीक नियोजना प्रमाणे मातीचे नमुने घेऊन तपासणी करिता विद्यापीठाच्या किंवा शासनाच्या माती परीक्षण शाळेत
पाठवावे.
४. स्वच्छता मोहिम हाती घेऊन जास्तीत जास्त कंपोस्ट साइड़े भरावेत.शेतातील काडीकच-यापासून कंपोस्ट खत
तयार करावे.
५. उताराच्या शेवटी दोन हेक्टर क्षेत्राकारीता २०x२०x३ मि. आकाराचे शेततळे खोदावे.
६. पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन असल्यास खड्डे खोदून तयार करावे.
७. शेतातील खोल मुळ्याची तणे व पालव्या खोदून काढाव्यात.
८. कडूनिंबाच्या निंबोळ्या जास्तीत जास्त गोळा कराव्यात.
९. पिकांचे हंगाम पूर्व नियोजन करावे. त्याकरिता लागणारे खते, बियाणे, तणनाशके, किटकनाशके यांची जुळवा जुळव करावी.
१०.उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे पिकांचे हंगामपूर्व नियोजनाप्रमाणे स्वच्छ करुन घरीच बियाण्याची
उगवण तपासणी तज्ज्ञाच्या माहितीसाठी कृषि विद्यापीठ किंवा विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञाकडे संपर्क करावा.

ब) पीक नियोजनाबाबत सूचना गहू

१) उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे असेल तर कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने काढणी करुन घ्यावी.
२) कंबाईन हारवेस्टरची उपलब्धता नसल्यास मंजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून पट्टा पद्धतीने शक्य तितक्या कमी
मजुरांच्या सहाय्याने गव्हाची कापणी व मळणी करुन घ्यावी.
३) कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्यास गव्हाची योग्य पद्धतीने वाळवणी करुन सेल्फॉस वापरुन गोदामात
साठवणूक करावी.
४) काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करुन शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे.
उन्हाळी भुईमुग
१) उन्हाळी भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये
२) उन्हाळी भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण
पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) भुईमुगास शक्य असल्यास स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे. उशिरा भुईमुग पेरणी झाली असल्यास झाडांना माती
लावावी.
४) पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही १० मि.ली पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
५) टिक्का रोगाचे नियंत्रणाकरिता क्लोरोथालोनील ७५ टक्के डब्लूपी २० ग्रॅम किंवा प्रोपिकोगाझोल २५ इसी १०
मिली किंवा हेक्साकोनाझोल १० मिली किंवा टेबुकोगाझोल २५.९ इसी १० मिली किंवा कार्बनडाझीम +
मॅन्कोझेब १० गॅम किंवा कार्बन्डाझीम २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तीव्रतेनुसार पुन्हा
१५ दिवसांनी फवारणी करावी. बुरशीनाशके आलटून पालटून वापरावी.
६) पाने पोखरणाऱ्या अळी, तूडतूडे व फुलकिडे नियंत्रणासाठी लॅब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० ते ६.० मि.ली किंवा क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २८ मि.ली किंवा किंवा क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी २३.३ किलो/हे.
प्रमाणे फवारणी करावी.

ऊस 

१) सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रात पीक चार महिन्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करुन तण विरहीत ठेवावे.
२) उन्हाळा चालू झाल्याने उसाला योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उस पिकास पाणी देण्यासाठी
ठिबक सिंचनाचा वापर करावा. पाणी कमी असल्यास सरी वरंबा पध्दतीमध्ये एक आड एक सरीस पाणी द्यावे.
३) सुरु हंगामी लागवड केलेल्या उस पिकाच्या लागणीस ६ ते ८ आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता
द्यावा.

सुर्यफुल, मूग व तीळ 

१) सुर्यफुल पिकाला कळी अवस्थेत, फुलोर अवस्थेत व दाणे भरण्याव्या वेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची
काळजी घ्यावी.
२) तीळ व मुग या पिकांना तणनियंत्रण करुन नियमित ६-७ दिवसाचे अंतराने ओलीत करावे.
३) उन्हाळी तिळात पर्णगुच्छ (फायलोडी)हा विषाणुजन्य रोग असून तुडतुड्यांमार्फत होतो. अशी झाडे दिसताच या झाडांचा नाश करावा. तुडतुडे या किडीच्या नियंत्रणाकरिता अंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी,

उन्हाळी धान 

१. धान पिक खोड किड्यांपासून नियंत्रणासाठी शेतात एकरी ८ कामगंध सापळे लावावेत. फूटव्यात प्रादूर्भाव ५
टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास क्लोरॅनट्रानिप्रोल ०.४ टक्के दाणेदार बांधीत पाणी असतांना टाकावे.
२. करपा रोगांच्या नियंत्रणासाठी हेक्झेकोनॅझोल ५ ई.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.

गुलाबी बोंड अळी: नियंत्रणाच्या उपाययोजना- 

१) पिकाची हंगाम संपवून किडग्रस्त बोंडांसहीत पऱ्हाट्याची सेंद्रीय खतासाठी विल्हेवाट लावावी.
२) प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जिनींग फॅक्टरीमधे १५ ते २० कामगंध सापळे (डिसेंबर ते जून
पर्यंत) लावून पतंगाचा मोठ्या प्रमाणावर नायनाट करावा.
३) हंगाम संपल्या बरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष तसेच सुप्तावस्थेतील
किडी उन्हाने किंवा पक्षाचे भव्य होऊन नष्ट होतील.

खरिप पिकाच्या बियाण्याचे नियोजन- 

१) यावर्षी अती पावसामुळे सोयाबिन सारख्या पिकांची हानी झाल्यामुळे बियाण्याची चणचण भासू शकते.
याकरीता घरातील धान्यातले किंवा मागच्या हंगामातील चांगले बियाणे वेगळे करुन पेरणीसाठी साठवून
ठेवावे.
२)त्याकरिता बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून पेरणी साठी बियाण्याचे योग्य प्रमाण ठरवता येईल व
त्यानुसार झाडांची प्रति हेक्टर संख्या राखणे शक्य होईल. परिणामी बियाण्यावरील खर्चात कपात व अपेक्षित
उत्पादन मिळविणे शक्य होईल.
३) शेतकऱ्यांनी आपल्या भागातील पारंपारिक पिके जसे ज्वारी, सुर्यफुल, मूंग व उडिद यासारख्या पिकांचे
नियोजन करावे.

क) भाजीपाला पीक नियोजन

१) सततच्या वाढत्या तापमानामुळे सर्व भाजीपाला पिकात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
२) कांदा काढणीसाठी आला असल्यास काढणी करुन शेतात ३ ते ४ दिवस सुकवावा नंतर पात कापून ३ आठवडे
सावलीत सुकवावा तदनंतर प्रतवारी करुन साठवणूक करावी.
३) लसूण काढणी झाल्यानंतर पातीचा रंग परतल्यानंतर जुड्या बांधून हवेशीर ठेवावा.
४) गवार व चवळी पिकाची तोडणी वेळोवेळी करावी.
५) भेंडी पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट ३० ई.सी. १५
मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
६) भाजीपाला पिकातील तण काढून घ्यावे त्यामुळे कीड व रोगाचा प्रादूर्भाव होणार नाही.
७) वेलवर्गीय पिकामध्ये रस शोषून घेणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमिथोइट ३० किंवा
इमिडक्लोप्रिड १७.८ टक्के एस एल ५ मिली व डाथेन एम ४५ (२५ गॉम) ची फवारणी प्रती १० लिटर
पाण्यातून हातपंपाने करावी.
८) भेंडी, भोपळा, वांगी, भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची
किंवा फिप्रोनिल २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच भाजीपाला पिकावरील
कोळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅग्रीन ३० सी.ई टक्के ५ मिली किंवा डायकोफॉल १८.५ सी.ई टक्के २०
मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

मिरची: 

मिरची पिकावरील फुलकिडे व कोळीचे एकात्मिक व्यवस्थापण करणे गरजेचे आहे. नत्र खताचा अवास्तव वापर
करू नये तसेच पिक दाटू देउ नये ५ टक्के निंबोळी अर्क यांचा आलटून पालटून वापर करावा म्हणजे रासायनिक
किटकनाशकामुळे अपेक्षित नियंत्रण मिळेल व या किडीचा उद्रेक होणार नाही. दोन फवारणीमधील अंतर नेहमी
१२ ते १५ दिवस ठेवावे. फवारणीच्या अगोदरच्या दिवशी मिरचीची तोडणी करावी. फवारण्यासाठी आवशक्तेनुसार
इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के दाणेदार ४ डॉम, इथियॉन ५० टक्के ३० मिली, लॅबडा सायहॅलोग्रीन ५ टक्के ६
मिली, फेनप्रोपॅथ्रीन ३० टक्के ३.५ मिली प्रती १० लि. पाणी किंवा इतर शिफारसीत रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

ड) फळझाडे नियोजन 

पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी जर लागवड केलेली असेल तर झाडांना, रोपांना किंवा कलमांना काठीचा आधार देऊन सद्यस्थितीत रोपांना, कलमांना पाण्याचा ताण बसू नये म्हणून पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

संत्रा/मोसंबी 

फळझाडाच्या सुकलेल्या फांदया काढून टाकाव्यात व बुरशीनाशकाची कॉपरऑक्सीक्लोराईड ३० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आंबीया बहारात फळगळ थांबविण्यासाठी २-४ डी. १.५ ग्रॉम जिबैलिक अॅसिड १.५ गॉम १ किलो युरिया १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता, देठ ठेवून सकाळी किंवा सायंकाळी काढावीत. फळे पिरगाळून काढू नयेत. फळे सावलित आणल्यानंतर हवेशीर व मोकळ्या जागेत पसरुन ठेवावीत. कागदी लिंबाप्रमाणेच फळे ६ टक्के मेण + 0.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनीट बुडवून ठेवाव्यात. द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे केटमध्ये भरावीत. केट८-१० अंश सेल्सीयस तापमान व ८५-९० टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड, रस, सिरप व कार्बोनेटेड शीत पेय तयार करता येतात.

कागदी लिंबु 

फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत. काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.फळे ६ टक्के मेण + ०.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात. द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या ०-२ टक्के वायूविजन असलेल्या १५० गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत किंवा केटमध्ये भरावीत. या पिशव्या ८-१० अंश सेल्सीयस तापमान व ८५-९० टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात ४०-४५ दिवस ठेवता येतात. कागदी लिंबापासून लोणाचे, गोड चटणी, कॉर्डियल सिरप इ. पदार्थ तयार करता येतात.

चिकू

काढणीस तयार झालेली फळे झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत. फळे सावलीत आणून पसरून ठेवावीत. फळे थंड झाल्यावर क्रेट मध्ये किंवा ०-२ टक्के वायुविजन असलेल्या १५० गेजच्या पॉलिथिन बॅग मध्ये भरावीत. पिशव्या बंद करुन १८-२० अंश सेल्सियस तापमान ठेवल्यास १५ दिवसांपर्यंत उत्तमरित्या साठविता येतात. पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कूपासून कॅण्डी, गोड चटणी करता येते. पिकलेल्या चिक्कूपासून पावडर तयार करता येते.

केळी 

केळीचा घड चांगला पोसण्याकरिता १टक्का पोटॅशिअम नायट्रेट ची फवारणी करावी. केळाला गोलाकार आकार आल्यावर इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.घड सावलीत आणल्यानंतर इजा न करता फण्या वेगळ्या कराव्यात.फण्या थंड झाल्यावर ६ टक्के मेण +- ०.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर केटमध्ये ठेवून १४-१५ अंश सेल्सीयस तापमानास व ८५टक्के आर्द्रतेत शीतगृहात तीन आठवड्यापर्यंत साठविता येतात. केळीपासून वेफर्स, सुकेळी व पावडर तयार करता येते.

आंबा 

पाड लागल्यावर झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळाची काढणी देठासहीत सकाळी किंवा सायंकाळी करावी. तसेच काढलेली फळे सावलीत ठेवावीत.फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावीत. थंड पाण्यात ठेवून फळांचे पूर्वशितकरण करावे व फळे ६ टक्के मेण + 0.१ टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत. द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे वायूविजन असलेल्या सीएफबी पेट्यांमध्ये किंवा क्रेटमध्ये ठेवून, १०-१२ अंश सेल्सीयस तापमानास व ८५-९० टक्के आर्द्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यंत साठविता येतात.कच्या आंब्यापासून लोणचे, आमचूर व पन्हे तयार करता येते. पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर (पल्प) काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.

डाळिंब 

डाळिंबाचा आंबे बहार घेतला असल्यास ठिबकव्दारे पाणी व्यवस्थापन करावे खत व्यवस्थापनासाठी फटीगेशन तत्राचा वापर करावा. ब्लोअर च्या सहाय्याने कीटक /रोग नाशकाची फवारणी करावी. बागेत दोन ओळीत गवत वाढले असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणनी किंचा रोटावेटरच्या तण काढावे. उन्हापासून फळाचे संरक्षण होण्यासाठी फळांना कागदी पिशव्या अथवा जुन्या कापडी पिशव्या चे फळांना आच्छादन करावे. तेलकट डाग रोगनियंत्रणासाठी झाडांची नैसर्गिकरीत्या पानगळ होईपर्यंत ताण द्यावा. पानगळ झालेल्या काड्याच्या शेंड्याकडील भाग वाळून जाईपर्यंत ताण द्यावा. त्यामुळे काड्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच उच्च तापमानामुळे डोळ्यांजवळ असणारे जीवाणू मरुन जातील व पुढील बहारामध्ये रोगाचे प्रमाण कमी होईल. बहार छाटणीवेळी शेंड्याकडील १० ते १५ से मी लांबीचा भाग छाटून काढावा तसेच शिफारशीत खतांची मात्रा देऊन नियमित पाणीपुरवठा करावा. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास १३५ किलो कार्बोफ्युरॉन ३ जी प्रति हेक्टर झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असतांना टाकून झाकावे.

पेरू 

पेरू फळ मृगबहारा करीता बाग मे महिन्यात ताणावर सोडावी व मे महिन्यात छाटणी करावी व ताण सोडतांना योग्य पाणी व खत व्यवस्थापन करावे.

सिताफळ 

सिताफळ फळ पिकात सद्यस्थितीत पानझड झालेल्या व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणाऱ्या हंगामा करिता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये तसेच मे महिन्यामध्ये झाडांची छाटणी करावी व त्यानंतर जून महिन्यामध्ये पावसाळा सुरु होताच खत व्यवस्थापन करावे व पावसामध्ये खंड पडल्यास पाणी व्यवस्थापन करावे.

आवळा 

सद्यस्थितीत आवळ्याची फुलधारणा होऊन फळे गर्भा अवस्थेत असल्यामुळे बागेमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत करू नये अन्यथा फळ गळ होण्याची संभावना असते.

इ-फुलझाडे नियोजन 

ग्लॅडिओलस:लेडिओलस या पिकाची पाने पिवळी पडू लागल्यास फुल दांड्यांची काढणी करुन कंद काढणीसाठी पाणी देणे बंद करावे. कंद साठवणीकरिता त्याची प्रतवारी करुन ३ बॉम बरशी नाशक १ लिटर पाण्यामध्ये मिसळुन तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनिटे कंद बुडवावीत. सावलीत सुकविलेली कंदे कापडी पिशवीत बांधून शितगृहात ७ ते ८.से. तापमानात ठेवावीत.
निशिगंध:निशिगंधाच्या फुलांच्या शेवटच्या काठमी मंतर ४०/५० दिवसानंतर परिपक्व कंद खोदून काढावेत. काढलेल्या कंदाला सडण्यापासून वाचवण्यासाठी ०२ टक्के बाविस्टीन किंवा मॅन्कोझेब पायडरची प्रकिया करुन ३० अं.से.मध्ये ६ आठवडया पर्यंत साठवावे.
झेंडू व गॅलर्डियाः झेंडू व गॅलर्डिया या फूलांची लागवड करण्याकरिता मे महिन्यात गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बियाणे पेरावे. जेणेकरुन जून व जूलै महिन्यात रोपाची लागवड करता येईल.
सुगंधी अर्क काढणे-गुलाबापासून गुलकंद व निशिगंधा आणि मोगरा फुलांपासून सुगंधी अर्क काढण्यासाठी मार्गदर्शनाकरिता पुष्प शास्त्र व प्रांगणविद्या विभागाकडे संपर्क साधावा,असे आवाहन संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी कळविले आहे.

Tags: अकोलाडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
Previous Post

मगांग्रारोहयो २७५३ मजूरांची उपस्थिती, मजूरीतही वाढ

Next Post

आरोग्य पर्यवेक्षिका यांनी सेवेवर ज्यांनापूर्वी केला गरजूंना जीवनावश्यक किट वाटून वाढदिवस साजरा 

RelatedPosts

आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
Next Post
medical-offcier-celebrates-birthday-telhara

आरोग्य पर्यवेक्षिका यांनी सेवेवर ज्यांनापूर्वी केला गरजूंना जीवनावश्यक किट वाटून वाढदिवस साजरा 

action on goodluck sweet & general

पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.