अकोला- जिल्ह्यात आज एकूण २८ अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५२२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५०० अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ४८४ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. आज अखेर २२ अहवाल प्रलंबित आहेत. देशात [COVID19-LINE country=”India” confirmed_title=”confirmed” deaths_title=”deaths” recovered_title=”recovered”]
आजपर्यंत एकूण ५२२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४०९, फेरतपासणीचे ७९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५०० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३९४ तर फेरतपासणीचे ७६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३० अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४८४ आहे. आज प्राप्त झालेल्या २८ अहवालात सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात एकूण १६ जण कोवीड बाधीत रुग्ण होते. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता सात जण रुग्ण उपचार घेत आहेत. या सात जणांपैकी तिघांचे चौथे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत दोघे भावंडे असून एक जण दुसऱ्या तपासणीत पॉझिटीव्ह आलेला तीन वर्षीय बालक व अन्य एक असे सात जण आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
आज पाच जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात २२ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात १५ प्राथमिक चार वैद्यकीय कर्मचारी, तर तिघे फेरतपासणीचे आहेत. सद्यस्थितीत ३३ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ५६८ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी २३६ जण गृह अलगीकरणात तर ७८ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३१४ जण अलगीकरणात आहेत. २०१ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
कोविड केअर सेंटर मधील सद्यस्थिती
निगेटीव्ह अहवाल आलेल्या संदिग्ध रुग्णांना १४ दिवसांसाठी संस्थागत अलगीकरण करुन कोविड केअर सेंटर मध्ये वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाते. सद्यस्थितीत अकोला येथील कोविड केअर सेंटर मध्ये ४८ जण दाखल असून बाळापूर येथे २८ जण दाखल असे एकूण ७६ जण आहेत. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये आजपर्यंत एकूण १२६ जणांना दाखल करण्यात आले होते. तेथून आतापर्यंत ७८ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बाळापुर येथील आयटीआय मध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अद्याप २८ जण दाखल असून त्यातील एकाचाही १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. थोडक्यात जिल्ह्यात कोविड केअर सेंटर मध्ये १५४ जण दाखल होते. त्यातील ७८ जण घरी गेले असून ७६ जण अजून देखरेखीत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.