पातुर (सुनिल गाडगे):- सध्या सर्वत्र लाँकडाऊन असल्याने दरोरोज मजुरी करुन उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. यांना अनेक दानशुरांनी वेगवेगळ्या स्वरुपात मदत करुन फोटो शेषन केले. असे दर्शवले की आम्ही मोठ कार्य केले. या मदतीचा एवढा स्वार्थ होता. जेवढे होईल तेवढी प्रसीध्दी करण्याचा प्रयत्न केला. पण आज पातुर शहरातील अंदाजे दोनशे कुटुंबातील सदस्यांना अन्यधान्यसह जीवनावश्यक वस्तु किराणा वाटण्यात आला असे वाटले हा दानशुर पण फोटो शेषन करेल. पण या युवकाने कोणत्याही प्रकारचे फोटो शेषन न करता गरजवंत नागरीकांना घरी जाऊन मदत केली व त्या कुंटुबाचे आर्शीवाद घेतले. तो युवक आहे पातुर गुरुवार पेठ येथील रहीवाशी पोलीस पाटील निरजंन कढोणे यांचा मुलगा सागर कढोणे. या युवकाची मदत खरोखर निस्वार्थी होती. कोणतेही प्रसीध्दी न करता मदत करणारे शेकडोत एकच राहतो हे आजच्या मदत वाटप कार्य पाहुन दीसुन आले आहे.