अकोट (शिवा मगर)- अकोट येथुन जवळच असलेल्या श्री संत वासुदेवजी महाराज वैष्णव ज्ञान मंदिर वडाळी (सटवाई) ता.आकोट, येथील श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वागीण बाल विकास सुसंस्कार शिबीर वैश्विक महामारी मुळे स्थगित करण्यात आले आहे. या शिबिराची विशेषता म्हणजे स्वत: श्री संत वासुदेवजी महाराजांनी बाल सुसंस्काराची गरज लक्षात घेऊन ८० वर्षापुर्वी श्री संत भास्कर महाराज संस्थान तर्फे हे शिबिर राबविले.
बालक बालिका हे समाजाचे भवितव्य व देश रचनेचा पाया आहेत. हे श्री संत वासुदेवजी महाराज जाणून होते. आपला स्वधर्म जर मुलांना कळला नाही तर काय देशाची प्रगती होईल ते करतील? खरे तर लहानपणापासून सुसंस्काराची गरज आहे लहान मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा आपण त्याला जसा आकार देऊ तसा तो दिसेल. बनेल. सुसंस्कारित मुलेच समाजात देशात,शांती,सुख, आनंद, नैतिकता, भक्ती कायम राहू शकतील. असा त्यांचा ठाम विश्वास होता. तरुण व बालकेच देश घडवू शकतात. तेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. हे आधारस्तंभच मजबूत करायला पाहिजेत म्हणूनच मग त्यांनी उन्हाळी बाल सुसंस्कार शिबिर घ्यायला सुरुवात केली. उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे प्रवर्तक श्री संत वासुदेवजी महाराज आता कल्पनाही करवत नाही अशा कठीण व प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलांना श्री संत भास्कर महाराज संस्थान आडगाव (बु)” ला शिबिरमध्ये वारकरी शिक्षण दिले. त्यामध्ये वारकरी धर्माचे रहस्य सांगितले. हरिपाठ,गीता, ज्ञानेश्वरी,गाथा समाजातील सर्व स्तरातील लोकांना पंक्तिप्रपंच न करता शिकवले. या शिबिरामधुन हजारो किर्तनकार,भागवताचार्य, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य,टाळकरी,वारकरी भक्त तैयार झालेत.
“श्री संत भास्कर महाराज संस्थान अडगाव (बु)” चे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, मधे विलिनीकरणानंतरही ही उज्वल परंपरा निष्ठेने अव्याहतपणे चालूच ठेवणारे एकमात्र पाहिले शिबिर आहे. ह्या शिबिराला श्री संत वासुदेवजी महाराज यांनी आनंदाने “यावदश्चंद्र दिवाळरौ” असा लिखित स्वरूपाचा भरभरून आशिर्वाद सुद्धा दिला आहे. श्री संत वासुदेवजी महाराज यांचे आज्ञेनेच स्थापित
“श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वागीण बाल विकास सुसंस्कार चँरीट्रेबल ट्रस्ट अकोली जहाँ.” द्वारा गेल्या अनेक वर्षा पासुन “श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबीराचे” आयोजन १ मे ते ३० मे पर्यंत करण्यात येत असते. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या ठीकाणाहून दरवर्षी शेकडो विद्यार्थी सहभागी होत असून त्यांचा सर्वांगीन विकास व्हावा म्हणुन वारकरी संप्रदायिक धार्मिक शिक्षण त्याच बरोबरच बौद्धिक,शैक्षणिक,शारिरीक,योगासन ह्या शिक्षणा बरोबरच सार्वजनिक लोकोपयोगी व्यसनमुक्ति, जलसंधारण, वृक्ष संवर्धन, स्त्री भ्रूण हत्या वैगेरे विषयांचे समाज प्रबोधनादी शिक्षण विणामुल्य दिले जाते. शिबिर यशस्वीपणे पार पडण्याकरीता बुवा महाराज मंडळी, दानेंद्र भक्त, अन्नदाते, सेवाधारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.
परंतु या वर्षी कोरोना विषाणुचा वैश्विक संकट आल्यामुळे व त्याचा भारतात प्रादुर्भाव वाढल्या मुळे सर्वांवर महामारि सारखा प्रसंग ओढवला आहे. शासनाने लॉकडाऊन सारखे नियम घालून दिल्या मुळे सदर परिस्थिती लक्षात घेता, या वर्षी उपरोक्त संस्थेने बाल सुसंस्कार शिबीर रद्द करण्याचे ठरविले आहे. याची संस्कार प्रेमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी.
महाराजाच्या प्रेरणेने राज्यभरात २०० च्या वर बालसुसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदायिक मंडळी करीत आहेत.
८० वर्षाची परंपरा लाभलेले हे शिबिर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार संसर्गजन्य महामारी टाळण्याकरीता सुरक्षेच्या दृष्टिने या वर्षीचे “बालसुसंस्कार शिबीर” रद्द करण्यात आले. मात्र तरी पालकांनी आपल्या मुला- मुलींना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच वेद,उपनिषद , महाभारत, रामायण, वारकरी संत साहीत्याचा अभ्यास, श्रावणबाळ, पुंडलिकराय, क्रांतिकारक, देशभक्त व थोर नेते यांचे कथानक सांगून त्यामधील आदर्श संस्कार मुलांवर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे त्यांना घरीच बाल सुसंस्कार शिबिरला शिकवल्या जाणारे विषय त्याचा अभ्यासक्रम घ्यावा. त्याचा त्यांना बौद्धिक, शारीरिक, मानसिक लाभ होऊन त्यांच्या जिवनाची वाटचाल योग्य दिशेने झाल्याशिवाय राहणार नाही. असे संस्थापक अध्यक्ष श्री. ह. भ. प. अशोक महाराज जायले यांनी कळविले.