अकोला- लॉक डाऊन कालावधीत शिथील केलेल्या बाबींसाठी आवश्यक परवानग्यांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली आहे.
विविध प्रकारच्या परवानग्या व त्यासाठीचे सक्षम प्राधिकारी याप्रमाणे-
१. बाहेरगावाहुन येणे व जाणे- जिल्हा पोलीस अधिक्षक
२. मनपा क्षेत्रातील दुकाने सुरु करणे- मनपा आयुक्त.
३. कृषि विषयक सर्व प्रकारच्या परवानग्या (एमआयडीसी क्षेत्र वगळून)- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी.
४. मनपा क्षेत्राव्यतिरिक्त परवानगी, रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा, टंचाईची कामे, बिगर सहकारी संस्था यांना भोजन, धान्य वितरणाची परवानगी, रेल्वे विभागाची कामे- संबंधित उपविभागीय अधिकारी
५. मगांग्रारोहयो ची कामे- संबंधित तहसिलदार.
६. सहकारी संस्था, बाजार समिती व अन्य परवानग्या- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था.
७. औद्योगिक प्रतिष्ठाने व अन्य परवानगी- महा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
८. पशुसंवर्धन, पशू व्यवसाय, पशू खाद्य, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विकणे- सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी.
९. जंगल, वने संबंधित उपक्रम- उपसंचालक सामाजिक वनीकरण.
१०. मत्स्य व्यवसाय, दुकाने, संकलन, वाहतूक, विक्रीइ. बाबत- उपायुक्त मत्स्य व्यवसाय, मत्स्य विकास अधिकारी.
११. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक (किराणा, औषधी इ.)- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी