• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनाला हरवून सात जण सुखरुप घराकडे; अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिला भावपूर्ण निरोप

Team by Team
May 1, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
medical college gave farewell
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- पातूरचे सात जण गेले २० दिवस कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन कोरोनाला हरवून आज सुखरुप घराकडे निघाले. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने त्यांना टाळ्या वाजवून भावपूर्ण निरोप दिला. या कोरोनावर विजय मिळविणाऱ्यांना निरोप द्यायला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सातही जण पातूरचे. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले ते शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी. तेव्हापासून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. हे सर्वजण दाखल होताच त्यांचेवर आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे उपचार सुरु झाले. हा उपचार कालावधी १४ दिवसांचा आहे. या कालावधीनंतर त्यांचे पुन्हा १५ तारखेला तपासणी करुन अहवाल घेण्यात आले. त्यात ते निगेटीव्ह आले. तेव्हाच त्यांच्या प्रकृतीत उतार पडत असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतर अवघड अशा दोन दर चोवीस तासांनी घ्यावयाच्या चाचण्या महत्त्वाच्या असतात. त्या पार पडल्या. त्यातही हे सगळे जण निगेटीव्ह आले. त्यामुळे ते बरे झाल्याचे शिक्कामोर्तब होण्याच्या जवळपास आले होते. त्यात त्यांच्या अन्य एक्स रे आदी सगळं ओके आल्याने त्यांना घराकडे जाता येईल, असे डॉक्टरांनी निश्चित केले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना वार्डातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , डॉ. अपूर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकुमार शिरसाम व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या रुग्णांना थेट घरापर्यंत सोडायला रुग्णवाहिका देण्यात आली होती. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी रुग्णालयातून बाहेर पाऊल ठेवले. बऱ्याच दिवसांनी मोकळ्या हवेत आले होते. सर्व सुरक्षा उपकरणांनी त्यांनी स्वतःला कव्हर केले होते. आता त्यांना आणखी चौदा दिवस घरातच अलगीकरण करुन रहावे लागणार आहे. या दरम्यानही त्यांच्या वैद्यकीय तपासण्या होणार आहेत असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कोरोना विरुद्ध लढणारी टिम

कोरोना विरुद्धची लढाई त्या सातही जणांनी जिंकली होती. आणि त्या लढाईचे शिलेदार, साक्षीदार सगळं प्रशासन होतं. कोरोना विरुद्ध प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात राहून उपचार करणाऱ्या या टिम मध्ये डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, डॉ.सुनिता आडे, डॉ.प्रिती लाहोरे, डॉ.श्रेय अग्रवाल, डॉ.अंकुश तोष्णिवाल, डॉ.मेघा आर्य, डॉ.मेघा चोपडे, डॉ.आमेरा सेत , डॉ.प्रविण सपकाळ, डॉ.संदीप आगरकर, डॉ.उपेंद्र कंझरकर, डॉ.विरेंद्र मोदी ,अधिसेविका श्रीमती.ग्रेसी मरीयम स्वच्छता निरीक्षक हेमंत इंगळे व उमेश रामटेके यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या टिमचे कौतूक केले आहे.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

वर्ग 6 मधील माहीन फिजा ने गरिबांना राशन किट वाटप करून केला वाढदिवस साजरा

Next Post

विविध परवानग्यांसाठी नियुक्त सक्षम अधिकारी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध

विविध परवानग्यांसाठी नियुक्त सक्षम अधिकारी

complaint

रेशन दुकानांसंदर्भात तक्रारनिवारणासाठी भरारी पथक गठीत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.