तेल्हारा (योगेश नायकवाडे) – स्थानिक अबुल कलाम आझाद उर्दू शाळा मधील विद्यार्थीनी तथा शहरातील प्रसिध्द शिक्षक प्रा. अझहर शाह सर यांची कन्या माहीन फिजा अझहर शाह हिने दि 23 एप्रिल रोजी आपला वाढदिवस गरीब गरजू लोकांना राशन किट वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. या राशन किट मध्ये सर्व सामान समावेश असून माहीन ने वर्षभरात आपल्या वाढदिवस साठी पैसा करून कुठलंही कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी म्हणून केलेल् कार्य प्रेरणादायी असून सर्व स्तरातून माहीन च्या कार्याचे कौतुक होत आहे. माहीन ने विविध स्पर्धा,आणि जिल्हा स्तरावर सुद्धा मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक मिळवले असून दिनी शिक्षण मध्ये सुद्धा विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. माहीन फिजा शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथील सेवानिवृत्त वरीष्ठ लिपिक अन्वर शाह बाबू, नगर सेवक गणी शाह यांची नात आहे.