बाळापूर (शाम बहुरूपे)- ग्रामपंचायत मनारखेड येथे कोरोना विषाणु अनुषंगाने सरपंच डॉ सुरज पाटील (लोड) यांच्या अध्यक्षतेखाली गांव समिती गठित करून विविध उपक्रम राबविले आहेत. मनारखेड येथे गांवबंदीसाठी गांव सीमेवर शिपाई नियुक्त करण्यात आला. मुंबई -पुणे येथून आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आपातकालीन परिस्थीतीसाठी विलगीकरण कक्ष स्थापन केला.
पुर्ण गावातील नाल्यांची व गांव सफाई करून तीन वेळा पंपाद्वारे फवारणी व ट्रॅक्टरद्वारे निर्जतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. गरजू व भूमिहीन व दिव्यांग अशा एकूण १२५ कुंटुबाना घरपोच राशन किट वाटप, करण्यात आले. प्रत्येक कुटुंबातील सदस्याला मास्क व प्रत्येक कुटुंबासाठी सॅनीटायझर घरपोच वाटप करण्यात आले. आरोग्य सेवक- सेवीका अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस स्वच्छाग्रही यांना पीपीई किट वाटप करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग लोकांचा खात्यात तीन हजार रुपये मदत देण्यात आली. तसेच सर्व कर्मचारी वर्गाला वाढीव भत्ता देण्यात आला असुन त्यांचा विमा सुध्दा काढण्यात आला. तसेच मनारखेड या गावात पोलीस गस्तीची मागाणी करुण लावुण घेण्यात आली व सामाजिक दायित्व म्हणून अशा विविध उपक्रम सरपंच डॉ सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. मनारखेड या गावात आशा सेविका म्हणुन सौ.वरुडकर यांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व उपक्रमांमधे उपसरपंच गोपाळ दिवनाले, राजेश पाटील, शिवशंकर लोड, नितिन सुरशे, शरद दिवनाले, लता सुरुशे, अंबादास नागे, विनोद मेसरे, तंटामुक्त अध्यक्ष संतोष पाटील, पोलीस पाटील गणेश दिवनाले, सचिव सुधीर काळे , ग्रामपंचायत कर्मचारी गजानन वारूडकर यांचे सहकार्य लाभले.