अकोला- जिल्ह्यात आज देखील सर्व आठही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आजअखेर एकूण ४६९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४५१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ४३५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. आज अखेर १८ अहवाल प्रलंबित आहेत.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६९, फेरतपासणीचे ७२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ नमुने होते. आज आठ अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटीव्ह आले आहे. आजपर्यंत एकूण ४५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५६ तर फेरतपासणीचे ६६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४३५ आहे.
जिल्ह्यात आजअखेर कोविडबाधीत संख्या १६ आहे त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित ११ जणांचे अहवाल फेरतपासणीत निगेटीव्ह आले असून फेरतपासणीतही पॉझिटीव्ह आलेला तीन वर्षीय बालक व मयत रुग्णाचे मुलगा व मुलगी हे दोघे भावंड असे तिघे जण आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
आज तीन जण नव्याने दाखल झाले. आजअखेर जिल्ह्यात १८ अहवाल प्रलंबित असून त्यात १२ प्राथमिक तर सहा फेरतपासणीचे अहवाल आहेत. सद्यस्थितीत ३४ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४९९ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १९२ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३०९ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ३४ जण दाखल आहेत. आज अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ४११२ जणांची तपासणी झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
अधिक वाचा: लॉकडाऊन च्या काळात घरी राहून पती पत्नीने खोदुन काढली विहीर