अकोला (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचा कापूस विना अट खरेदी करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांच्या कडे लॉकडाउन असल्यामुळे व्हाट्सप च्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात आले. या कापूस खरेदीच्या शेतकऱ्यांसाठी काही सूचना दिल्या आहेत. यात शेतकऱ्यांना कापसाची नोंदणी नोटकॅममध्ये कापसासोबत सेल्फी काढून ऑनलाइन नोंदणी करावी तसेच विक्रीसाठी एफक्यु दर्जाचा कापूस आणण्यासाठी सांगितले आहे.
या वर्षी येन हंगामात पाऊस पडल्याने कापसाचा दर्जा राज्यभर घसरला आहे. त्यामुळे सद्या शेतकऱ्यांनकडे मोठ्या प्रमाणावर नॉन एफक्यु कापूस असल्याने हा नॉन एफक्यु कापूस कोणाला विकायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याने सर्व शेतकऱ्यांचा सर्व कापूस विनाअट खरेदी करण्यात यावा. सर्वच शेतकऱ्यांकडे नोटकॅम उपलब्ध नसून नेटवर्क व लॉकडाऊन मुळे मोबाईल रिचार्ज चा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या नोंदणी साठी शेतकरी कृषिउत्पन्न बाजार समिती गाठत असून अनेकांना या नोंदणीत अडचणी येत आहेत. ज्यांनी नोंदणी केली त्यांना आपली नोंदणी झाल्याबद्दल कुठलीही सूचना मिळत नाही.
त्यामुळे कापसाची नोंदणी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवर करावी शेतकऱ्यांना कापूस खरेदीच्या सूचना कृषिउत्पन्न बाजार समितीमार्फत द्याव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे विलास ताथोड, अविनाश नाकाट, डॉ निलेश पाटील व धनंजय मिश्रा यांनी अकोला जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांचा कडे निवेदनाद्वारे केली आहे.