अकोला (प्रतीनिधी ): संपुर्ण देशात कोरोनाची दहशत पसरली असुन लॉकडाऊनमुळे देशातील व महाराष्ट्रातील नागरीक त्रस्त आहेत. आपला उदारनिर्वाह कसा करावा अनेक परीवांराना दोन वेळच्या अन्नाची सोय होत नसल्याचे चित्र आहे .हाताला काम नसल्याने नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे.आपल्या तालुक्यातील नागरिकांना काही तरी मद्दत करण्याच्या उदेश्याने अशोका फाउंडेशन बाळापुरचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी गावातील नागरीकांना विस- पंचविस दिवस पुरेल येवढे धान्य वाटप केले आज गावातील नागरीक या महामारी सारख्या आजाराने आपले घर सोडुन जाऊ शकत नाही.त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुबांवर उपासमारीची वेळ आली असतांना या कार्यात सहकार्य करुन आपला वाटा उचण्याचे कार्य इतरांन समोर अशोका फाउंडेशन ने आदर्श ठेवले आहे लॉकडाऊन जो पर्यत संपुर्णपणे उघडणार नाही तोपर्यत अशोका फाउंडेशन गरजु गोरगरीब लोकांचा सहारा बनुण त्यांच्या पर्यत धान्य वाटप सुरू ठेवणार आहे यावेळी अशोका फाउंडेशन चे मनिषा तायडे, उमेश भाऊ इंगळे,अतिश आंबेडकर,कीशोर मोरे,यासिर खान,अर्फत भाई,भिमा वानखेडे,बलवंत गोपणारायण, नरेंद्र इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते