हिवरखेड- सध्या संपूर्ण देशात करोना विषाणूजन्य व्हायरसने थैमान घातले आहे या व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग पोलीस प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था ह्या दोन हात करताना दिसत आहेत. त् मागील एकवीस दिवसापासून संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. त्यामुळे देशाचे व राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, मात्र या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हिवरखेड येथील भूमिपुत्राने अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या डॉक्टर नर्स आरोग्य सेवक पोलीस ग्रामसेवक यांच्या या आरोग्याच्या दृष्टीने सेफ्टी असलेल्या महेश सेफ्टी किटचा महेश एंटरप्राइजेस अकोला प्रेस क्लब हिवरखेड कोरोना मुक्त समिती हिवरखेड यांच्यावतीने वाटप करण्यात आला.
सध्या महेश सेफ्टी किट ह्या अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचा महेश बजाज यांचा मानस असून अशा आणीबाणीच्या काळात आपण मानव धर्म निभावत असून किट सोबतच गरजू व्यक्तींना मास्क सुद्धा वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सध्या बजाज यांनी500 सेफ्टी किट वाटल्याअसुन पुढेही ही 2000 सेफ्टी टिकीट वाटप करण्याचा त्यांनी मानस दाखवला हिवरखेड येथे हे अकोल्यावरून येऊन गावातील डॉक्टर पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांना ह्या कीट देण्यात आले आहे.
यावेळी महेश इंटरप्राईजेस चे महेश बजाज जैन भोजनालयचेईश्वर जैन अकोला व हिवरखेडचे ठाणेदार आशिष लव्हांगळे प्रेस क्लबचे संस्थापक श्याम शील भोपळे प्रेस क्लबचे अध्यक्ष बलराज गावंडे पत्रकार किरण सेदानी गोवर्धन गावंडेसागर राऊत मनीष भुडके गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच सुरेश ओंकारे ग्रामविकास अधीकारी गरकल साहेब डॉ. प्रशांत इंगळे सुनील बजाज मनोज राठी सतीश इंगळे पोलीस पाटील प्रकाश गावंडे सर्व पत्रकार पोलीस बांधव ग्रा पं. कर्मचारी आदींच्या उपस्थितीत महेश सेफ्टी किटचे चे वाटप करण्यात आले
अधिक वाचा: अकोट शहरात धडक कारवाई ; मास्क न घालने पडले महागात