अकोला (प्रतीनिधी)- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी देशभर लाँकडाऊन करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक जणांना रोजगाराअभावी घरी बसावे लागले आहे. त्यामुळे गोरगरिब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी तुलंगा बु येथील मा.अरुणभाऊ कचाले(अध्यक्ष) खरेदी विक्री संघ पातुर यांच्या सहकार्याने व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा आँल इंडिया कार्यरत यांच्या वतीने तुलंगा बु येथिल गोरगरिब कुटुंबाना आज सामाजिक अंताराचे (सोशल डिस्टन्सिग) भान ठेवून धान्य वाटप करण्यात आले. उपस्थिती मा.सतीश देवराव हातोले (संस्थापक/अध्यक्ष), मा.प्रभाकर अंभोरे (उपाध्यक्ष), मा.शुभम रोकडे(सचिव), मा.कृष्णा हातोले (सहसचिव), मा.मुकेश हातोले (प्रसिद्धी प्रमुख), मा.सुरेश हातोले (सदस्य), मा.संगम हातोले, मा.प्रदिप रोकडे, मा.प्रणव तायडे, मा.संतोष हातोले, मा.शिलवंत हातोले, अमर सुरवाडे, आदित्य हातोले, मा.विनोद हिवराळे, मा.राजकुमार तायडे, मा.संदेश हातोले, मा.दिनेश हातोले(वार्ताहर), मा.महेश कचाले, प्पपु आंधळे यांचे सहकार्य लाभले.