वाडेगाव (डॉ शेख चांद) – लॉक डाऊन च्या परिणामामुळे अनेक मजूर मुली अकोला जिल्ह्यात ताटकळत बसले होते. त्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याने खडकी येथुन सर्व मुली अकोला येथून त्याच्या घरी परतण्यासाठी बाळापूर मार्गे वाडेगाव या रस्त्याने जात असताना कर्तव्यार असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांनि त्या मुलींना विचारपूस केल्याने त्यांच्या घरी आंध्राप्रदेश ला जात असल्याचे सांगितले.
या मुलीबाबत येथील पोलिस चौकीचे सहाययक पोलीस निरीक्षक महादेव पडघन यांना माहिती देऊन त्यांनी तहसीलदार यांना माहिती पुरवली. तहसीलदार भुसारी यांनी घटनास्थळी महसूल विभागाच्या कर्मचारी डी एस सोळंके, गजानन भागवत, तलाठी एस एन ताथोड, कोतवाल नारायण घाटोळ, नारायण मानकर, आदी कर्मचारी घटनास्थळी पोहचून सर्व महिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सांगितली. त्यांना सर्व मुलींना अकोला येथे घेऊन जाण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहे .तसेच त्यांना खाजगी वाहनाने अकोला येथे पाठविनायत आले आहे. यावेळी सहाययक पोलिस निरीक्षक पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव पोलीस चौकीचे अमर पवार, विशाल जावळे, देविदास येउल, अशोक नवलकर यांनी तपास करून या सर्व मुलींना वरिष्ठांच्या सूचनेनुसार अकोला रवाना केले.