तेल्हारा: कोरोना व्हायरसचा प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत सहकार विभागामार्फत तेल्हारा शहरामध्ये फळे, भाजीपाला व किराणा आदि जीवनावश्यक वस्तूंची घरपोच वितरण करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाने तेल्हारा शहरात प्रफुल बोदडे यांची निवड केली आहे. यामार्फत संस्था नागरिकांच्या दारात जाऊन अत्यावश्यक वस्तू पुरवणार आहेत. सहकार विभाग राज्यात प्रथमच हा प्रयोग करीत असल्याचे मानले जात आहे.
पणन संचालक व विभागीय सहनिबंधक यांनी दिलेले निर्देश आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीनुसार तालुक्यातील घाऊक व किरकोळ बाजारातील ग्राहकांची संख्या कमी करण्यासाठी सहकार संस्था धर्मादाय संस्था आधी मार्फत घरपोच सेवा देण्यासाठी पंधरा संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्था शहरातील विविध भागातील किराणा धान्य, फळे, भाजीपाला व जेवणाची वस्तूंची घरपोच वितरण करणार आहेत. ही सेवा रविवार 29 मार्च पासून तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. तरी या सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आलेली आहे.
सहकार्याची अपेक्षा
“प्रतिबंध करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये म्हणून ही घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे घरपोच मिळणाऱ्या वस्तू बाजार भावात मिळतील आणि फळे व भाजीपाल्याचा पुरवठा दर दिवशी सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान करण्यात येईल. या उपक्रमाला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.”
डॉ. प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
“तेल्हारा शहरातील सर्व नागरिकांना घरपोच किराणा मालाचे वितरण करण्यात येत आहे. तरी, नागरिकांनी आपल्या घरातच राहून किराणामाल घरपोच मिळविण्याकरिता व्हाट्सअप नंबर ९४२३६१०७२७ या व्हाट्सअप नंबर वर आपल्या किराणा मालाची यादी पाठवून सहकार्य करावे.
अधिक वाचा: रोटरी क्लबतर्फे पीपीई किट्स, फेसमास्क; सामाजिक संघटनांतर्फे आर्थिक मदत