अकोला,दि.१७- जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी आपला मदतीचा हात प्रशासनाला देऊ करतांना आज रोटरी क्ल्ब या संस्थेने पीपीई किट्सचे वाटप केले तर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना फेसमास्क चे वाटप केले तर जिल्हा मराठा मंडळ, चिखलगाव गावकरी मंडळी यांच्यासारख्या संस्थांनी मदतीचे धनादेश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सुपूर्द केला.
अकोला जिल्हा मराठा मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये, प्रधानमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये दिले. तर चिखलगाव गावकरी मंडळीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपयांचा निधी दिला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजीत सपकाळ, ॲड. संजय पाटील, प्रकाश पाटील, डॉ. विनोद बोर्डे आदी उपस्थित होते. तर चिखलगावचे सरपंच सचिन थोरात, दामोदर थोरात, नामदेवराव ढगे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लबने डॉक्टरांसाठी ४० पीपीई किट्सचे वाटप केले. यावेळीही ना. संजय धोत्रे यांच्यासह इस्त्राईल नाजमी, डॉ. जुगल चिरानिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय वझे, ॲड मनोज अग्रवाल, डॉ. सत्यनारायण खोरीया, विनोदकुमार टोरल आदी उपस्थित होते.