अकोला- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉक डाऊनचा कालावधी रविवर दि.३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सहकार विभागाची शनिवार दि.२५ व रविवार दि.२६ रोजी आयोजित खाते परीक्षा आता अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी दिली आहे.
अधिक वाचा: विशेष लेख; कोरोना प्रादुर्भाव काळात ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी