• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट व दूरस्थ संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-13-quarantine
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१४ – जिल्ह्यात एकूण १३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले या रुग्णांच्या निकट व दूरस्थ रित्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत. त्यात ६० अत्यंत निकट संपर्कातील व्यक्ती आहेत. यातच खामगाव जि. बुलडाणा येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाळापूर येथील दोघांचाही समावेश आहे.

याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला शहरात पहिल्या टप्प्यात दोन जण पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील पहिल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील १४ व्यक्ती होत्या तर दूरस्थ संपर्कातील ३० व्यक्ती होत्या. निकट असलेल्या व्यक्ती ह्या जास्त जोखमीच्या समजल्या जात असल्याने त्यांचेही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १० जणांचे अहवाल प्राप्त असून तिघे पॉझिटीव्ह तर अन्य सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ३० व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अकोल्यातीलच दुसऱ्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या निकट संपर्कातील आठ व्यक्ती होत्या. त्यातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ४९ जणांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बाळापूर येथून दाखल झालेल्या एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या (मयत झालेल्या) निकट संपर्कात पाच जण होते. त्या पाचही जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तरीदेखील त्यांना संस्थागत अलगीकरणात तर अन्य २२ व्यक्ती जे दूरस्थ संपर्कात होते त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पातूर येथील सात व्यक्ती  पॉझिटीव्ह आढळल्या होत्या. त्यांच्या निकट संपर्कात असलेल्या ३१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर दूरस्थ संपर्कातील  २३९ जणांचेही गृह अलगीकरण करण्यात आले असून ३१ जण अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संस्थागत अलगीकरणात आहेत. तसेच खामगाव जि. बुलडाणा येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले बाळापुरचे  दोघे जण असून त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते ही संस्थागत अलगीकरणात आहेत.

एकूण जिल्ह्यात  पॉझिटीव्ह रुग्णांच्या अत्यंत निकट संपर्कात ६० जण होते तर  दूरस्थ संपर्कात ३४० जण आल्याचे प्रशासनाने शोधून काढले , हे सर्व जण सध्या संस्थागत वा गृह अलगीकरणात असून ते वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

Tags: corona update
Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

Next Post

२९६ पैकी २१९ जणांचे अहवाल प्राप्त, २०६ निगेटिव्ह

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
akola-corona-update-3-april-2020

२९६ पैकी २१९ जणांचे अहवाल प्राप्त, २०६ निगेटिव्ह

Jitendra Papalkar

संचारबंदी दि.३ मे पर्यंत कायम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.