तेल्हारा (प्रतिनिधी)- संपूर्ण देशामध्ये सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा पादुर्भाव वाढु नये म्हणून Lockdwon करण्यात आले असून सर्व शाळा महाविद्यालय सुद्धा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थीवर्ग घरी आहेत त्याच बरोबर सर्व नागरिकांची विचारांची प्रगल्भता वाढावी या करिता छत्रपती प्रतिष्ठान तर्फे ऑनलाईन घर बसल्या निबंध स्पर्धेचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने करण्यात आले आहे.
तेल्हारा येथील छत्रपती प्रतिष्ठान करोनाच्या धर्तीवर लहान मुले घरा बाहेर न जाता, घरात रहा आणि कोरोना पासून दूर राहावी याकरिता तसेच लोकांनी आपले विचार व्यक्त करण्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर निबंध लिहून हे निबंध Whatsapp, email id वर पाठवावे असे आवाहन छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेला अकोला जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे . सोशल मीडिया हल्ली मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो याचा सदुपयोग म्हणून सोशल मीडियाचा वेगळाच उपयोग घेऊन अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वैचारिक शक्ती तर वाढणारच असून त्याच बरोबर कोरोना विषयी जनजागृती सुद्धा या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.
ह्या स्पर्धेतील प्रथम तीन सर्वोकृष्ठ निबंधाना बक्षिसे सुद्धा छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणार आहे या निबंध स्पर्धेकरीता प्रथम बक्षीस 1001 रोख सौ सीमा दिलीप पिवाल यांच्या कडून तर द्वितीय बक्षीस 701 रु रोख सौ.दीपाली निलेश धनभर व तृतीय बक्षीस 501 रु रोख सौ अरुणा मंगेश ठाकरे यांच्या कडून देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वच वयोगटातील असून ही स्पर्धा मध्ये फक्त तेल्हारा तालूकातील व्यक्ती सहभाग घेऊ शकतो आहे. स्पर्धकांनी त्याचे निबंध त्यांच्या नावासह दि १६ एप्रिल २०२० पर्यत आमच्या मो नं ९४२०३६३६९९ या नंबर वर पाठवावण्याचे आवाहन छत्रपती प्रतिष्ठान द्वारे कऱण्यात आले आहे .