अकोला- कोरोना विषाणू चाचणीसाठी व्हीआरडीएल लॅब ही कार्यान्वित झाली असून कामकाजाच्या दृष्टीने या लॅबचा कालचा पहिला दिवस होता. काल या लॅब मध्ये २५ नमुने तपासण्यात आले होते. तर आज ४२ नमुने तपासण्यात आले अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान अकोला जिल्ह्याचे नागपूर येथे प्रलंबित असलेले सॅम्पल्सही परत अकोल्याला पाठविण्यात आले असून त्यांचीही चाचणी आता अकोल्यातच होणार आहे. दरम्यान आज नव्याने जे सॅम्पल घेण्यात आले त्यात १६ हे अकोल्यातील असून दोन मात्र खामगाव येथील आहेत, अशीही माहिती देण्यात आली.
अधिक वाचा: जिल्ह्यात २११ पैकी १६१ जणांचे अहवाल प्राप्त, १४८ निगेटिव्ह; ५० प्रलंबित