अकोला,दि.१३ – केंद्र व राज्य शासन , अंगीकृत उद्योग , व्यवसाय , महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालीका , नगरपालीका , तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असून ‘महास्वंयम’ या वेबसाईटवर ही माहिती भरता येईल, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु.रा.झळके यांनी कळविले आहे.
या संदर्भात दिलेल्या माहित पत्रकात म्हटले आहे की, सर्व सरकारी तसेच खाजगी आस्थापना , उदयोग , व्यापार , व्यवसाय , कारखाने २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात त्यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसुचीत करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार नियोक्त्यांना त्यांचे लॉगइन मधून हे विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.gov.in या चवेबपोर्टलवर ऑनलाईन तिमाही विवरण (ईआर-१) पत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनवर युजर आयडी व पासवर्डने आपले लॉगइनमधून ईआर रिपोर्ट मध्ये ई-आर-१ या ऑप्शन वर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ईमेल वर संपर्क करावा. दि.३१ मार्च २०२० या तिमाही अखेर वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहितीचे विवरण ई-आर-१ या विवरणपत्रात ३० एप्रिल २०२० पर्यत महास्वंयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे अनिवार्य आहे,असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु.रा.झळके यांनी केले आहे.