अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर): घरच्या पासून लांब आहेत म्हणून घाबरू नका तुम्ही निरोगी आहात जिथे आहात तिथेच थांबा असा धीर विलगीकरण कक्षातील लोकांना अकोट महिला समुपदेशन केंद्रातील समुपदेशक देत आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणची लोके घरी जाऊ शकली नाहीत अशा लोकांना आश्रय स्थळ येथे ठेवण्यात आले. अकोला जिल्ह्यातील अकोट या ठिकाणी मध्यप्रदेश अमरावती व बुलढाणा या ठिकाणचे कामगार वर्ग नगर परिषद शाळा क्रमांक 7 आकोट या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून महिला व बाल विकास विभाग यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन करण्यात आले त्यांना करून विषयी बद्दल माहिती देण्यात आली होती त्यापासून कोणत्या प्रकारे उपाययोजना करावयाची सुद्धा त्यांना माहिती देण्यात आली यावेळी महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक मंगेश रोंघेव रेणुका मोरे यांनी समुपदेशन करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कोरोना ची माहिती प्रतिबंधासाठी घ्यायची काळजी आश्रित लोकांच्या अडचणीचे निरासन. त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न. त्यांना धीर देऊन आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न याबद्दल त्यांना समुपदेशन करण्यात आले