अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर): दिनांक 11/4/2020 रोजी पो.स्टे.अकोट शहर येथे गुप्त बातमी दारा कडून बातमी मिळाली की अकोट शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या ममता बेकरीचे बाजूला असलेल्या किरकोळ देशी दारूच्या दुकानाला उत्पादन शुल्क विभाग अकोला यांनी सिल केलेली असतांना त्यांच्या दुकाना वरील गोडाऊन मधून काही लोक देशी दारू चा माल विक्री करीता काढून घेवुन जावुन त्याची विक्री करीत आहेत.
अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे रेट प्रो.रेडकामी पो.पोस्ट ऑफिस कडे गेले असता एक इसम देशी दारूचे दुकान वरील मजल्यावरून लहान शेटर मधून खाली उतरून एक पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोतडीत काहीतरी घेऊन मोटर सायकल वर ठेवून जातना दिसला वरून तेचा पाठला केला असता सदर इसमाने त्याच्या ताब्यातील नायलॉन पोतडी खाली फेकून पळून गेला.
वरून नायलॉन पोतडी ची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारूचे टॅंगो पंच 180 एम. एल. चे 35 कॉटर फुटलेले व 13 कॉटर 180 एम. एल. चे कॉटन मिळून आले वरून पडून गेलेल्या इसमाची माहिती काढली असता तो देशी दारूचे दुकान चालविणारा मॅनेजर संभा थोरात असल्याचे समजले त्यानंतर देशी दारूच्या सीलबंद असलेले दुकानाच्या बाजूला असलेल्या लहान जिन्याची शटरची पाहणी केली असता कुलूप उघडे दिसले वरून लहान जिन्याचे शटर उघडून पहिल्या माळ्यावर जाऊन पाहणी केली असता गोडाऊन चे शटर कुलूप कघडे दिसले त्यावरून गोडाऊनची शटर उघडून आत्मध्ये पाहणी केली असता ते देशी दारूचे दुकान अनुज्ञाप्ती धारकाचे नाव जे. बी. जयस्वाल यांच्या दुकानाचे गोडाऊन असल्याचे निष्पन्न झाले सदर गोडाऊन मध्ये 1922 देशी दारूचे बॉक्स (5232 कॉटर) किंमत.302116/ रू चा मुद्देमाल मिळून आल्याने मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेश क्रमांक कक्ष 2/प्रश./गृह/ कावी/98/2020 दिनांक 23/03/2020प्रणाने अकोला जिल्ह्यात कलम 144 जा.फौ.नुसार कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचार बंदी आदेश लागू असताना त्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून देशी दारू च्या गोडाऊन मधून देशी दारूचे बॉक्स हे किरकोळ विक्री करिता घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे संभा थोरात राहणार आकोट यांचे विरुद्ध क.65 इ, 66(1)ब,83 महा दारूबंदी कायदा सह कलम 188 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्हायाचा अधिक तपास सुरू आहे वरील नमूद कारवाई मा उपविभागीय पो. अधिकारी सुनील सोनवणे. पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक पो. उप.नि रंजीतसिंग ठाकूर.पो.हे.कँ. उमेश चन्द्र सोळंके ना. पो कँ. रमेश वसे. सुलतान पठाण गोपाल अगडते.पो.कँ. विजय क्ष विशाल तांदळे मनिष कुलट विठ्ठल चव्हाण अंकुश डोबाळे यांनी केली आहे.