अकोला- जिल्ह्यात ज्या भागात कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्यानंतर सील केलेल्या भागात कोणालाही कोणत्याही वाहनाद्वारे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय या भागात भाजीपाला व किराणा माल या सुविधा घरपोच देण्यासाठीही प्रशासनाने तयार केली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
या भागात कोणाही नागरिकाने घराबाहेर पडू नये, वाहनांवर फिरु नये, असे करतांना कोणीही आढळल्यास वाहन व वाहन चालविण्याचा, वाहनाचा परवाना कायमस्वरुपी जप्त करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.