अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर ): अकोट अकोला रोडवरील चोहट्टा बाजारजवळील राजेश लाऊत यांच्या एस्सार पेट्रोलपंपावर तहसीलदारांनी दिलेल्या अचानक भेटीत लाॅकडाऊनच्या वेळेत पेट्रोल पंप सुरू असल्याची बाब तसेच पेट्रोलपंपावर कॅनमध्ये पेट्रोल देताना आढळलयाच्या कारणावरून तहसीलदार राजेश गुरव यांनी पेट्रोलपंपाला सील लावण्याची धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाॅकडाऊनच्या वेळेत सुरू असलेल्या या प्रकरणामुळे तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी आपले कर्तव्य रात्रंदिवस सुरू ठेवले आहे. जिल्हयात 13 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाल्याने जिल्हाधिकारयांनी संपूर्ण जिल्हात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात सुध्दा तहसीलदार राजेश गुरव व नायब तहसीलदार हरीश गुरव यांनी आपल्या गस्ती वाढवलेल्या आहेत.